शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेना पक्षावरुन सुरु असलेला वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहचला आहे. ८ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगात याबाबत सुनावणी घेण्यात येणार आहे. त्तपूर्वी अपक्ष आमदार रवी राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. “उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली” असल्याचा आरोप राणांनी केला आहे.

हेही वाचा- “मी फोन करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान

शिवसेनेचे चिन्ह शिंदेना मिळणार

एकनाथ शिंदेमध्ये खऱ्या शिवसैनिकाचे विचार दिसून येतात. ९० टक्के शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत आहे. बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेकडेच जाणार. एवढचं नाही तर चिन्हासोबत शिवसेना भवनही एकनाथ शिंदेना मिळेल, असेही राणा म्हणाले आहेत.

जनतेची दिशाभूल करण्याचं काम राऊतांकडून

संजय राऊतांनी नुकतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. लवकरच ही मुलाखत प्रकाशित केली जाईल. यानंतर अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात य़ेत आहे. ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे जनतेसमोर येत नव्हते त्या त्या वेळेस संजय राऊत ठाकरेंची मुलाखत घ्यायचे आणि ती प्रकाशित करायचे. संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात आणि उद्धव ठाकरे संजय राऊतांचे म्हणणे ऐकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवण्याचं श्रेय संजय राऊतांना जातं, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.

हेही वाचा- …मग शरद पवार नेमके कोणते? बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेनंतर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा बोचरा सवाल

संजय राऊत शरद पवारांचे पगारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखत घेणं आणि प्रसिद्ध करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत करत आहे. राऊत हे दिवसेंदिवस बिन बुडाचे तांबे बनत चालले आहेत. तसेच ते शरद पवारांचे पगारी आहेत. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंकडून जी अपेक्षा होती ती आता राहिली नाही. म्हणून उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्वही मिटवायची सुपारी संजय राऊतांनी घेतली असल्याची गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.