शासकीय जागा हडपल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडनेरा येथील १०० कोटींची शासकीय जमीन मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शिवाजी पार्क शाखेत तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोप आमदार रवि राणा यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून यावर २२ ऑक्टोबरला सुनावणी होईल.

अमरावती जिल्ह्यतील बडनेरा  क्षेत्रात येणाऱ्या साईनगर येथील सुमारे पाच एकर जमीन शासकीय तंत्रनिकेतनसाठी घेण्यात आली होती. वर्षभरात या जमिनीचा वापर तंत्रनिकेतनने न केल्यास ती जमीन पुन्हा सरकारजमा होईल, असा शासन निर्णय होता. परंतु त्या जमिनीवर शासकीय तंत्रनिकेतनची इमारत निर्माण न करता तेथे दिल्ली पब्लिक स्कूल या विनाअनुदानित संस्थेची इमारत उभारली. त्याची तक्रार विभागीय आयुक्तांना करण्यात आली.

विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी  अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यानुसार राणा एज्युकेशन संस्थेचे संचालक आ.रवि राणा, खा. नवनीत राणा, सुनील राणा, अनुपमा राणा, अशोक राणा यांच्यासह इतर सदस्यांनी शासनाची पाच एकर जमीन गैरमार्गाने लाटली.

यासोबतच भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सरकारी कंपनीला दिलेली जमीन ताब्यात घेतली. त्या जमिनीवर अनधिकृतपणे १०० कोटी रुपयांची माया जमविली असल्याच्या ठपका सदर अहवालात ठेवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana pmc bank akp
First published on: 17-10-2019 at 03:12 IST