करोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

हेही वाचा-  देशात जुलैपर्यंत Johnson & Johnson ची करोना लस मिळण्याची शक्यता, जाणून घ्या किंमत

राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद

दरम्यान, आज राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record vaccinations in the state more than 7 lakh citizens vaccinated in a day srk
First published on: 26-06-2021 at 19:36 IST