भारतात २१ जूनपासून सर्वांसाठी करोना लसीकरण सुरू झाले आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक लस उपलब्ध आहे. परंतु पुढच्या महिन्यापासून जॉन्सन आणि जॉन्सनची करोना लस देशात उपलब्ध होऊ शकेल. यामुळे कोविड विरूद्ध लढा अधिक तीव्र होण्यास मदत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Johnson & Johnson करोना लस खासगी क्षेत्रातून देशात खरेदी केली जाईल. खासगी क्षेत्र ही लस खरेदी करेल. त्यामुळे खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध असेल. सरकारने  Johnson & Johnson च्या खरेदीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. देशात करोनाविरूद्ध सरकारी लसीकरण प्रामुख्याने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनद्वारे चालू आहे.

हेही वाचा- काळजी घ्या, Delta Variant करोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO चा इशारा!

असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाइडर्सचे म्हणणे आहे की, Johnson & Johnson लस थेट कंपनीकडून घेतली जाईल. ही लस जुलैपर्यंत देशात उपलब्ध होऊ शकते. सुरुवातीला या लसीची केवळ १००० डोस उपलब्ध असतील.

काय असेल किंमत

Johnson & Johnson करोना लस देशामध्ये जवळपास १८५० रुपयापर्यंत मिळेल. या लसीची खास गोष्ट म्हणजे ती एकच शॉट लस आहे, म्हणजेच लोकांना त्यातील फक्त एक डोस घ्यावा लागेल.

देशात २४ तासांत ४८,६९५ नवे रुग्ण

गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४८,६९५ नवीन करोना बाधित आढळून आले आहेत. तर १,१८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी २१ जून रोजी ४२,६४० रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, गेल्या २४ तासात ६४,८१८ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहे. त्यामुळे १७,३०३ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनार गेल्या २४ तासात ४८ हजार ६९८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तर ६४ हजार ८१८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी १,१८३ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९१ लाख ९३ हजार ८५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात ३ लाख ९४ हजार ४९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५६५ सक्रिय रुग्ण आहेत.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johnson johnsons corona vaccine likely to be available in the country by july srk
First published on: 26-06-2021 at 15:55 IST