सातारा : राज्यात नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे.त्यानुसार या संस्थेच्या नियमानुसार मुख्यमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असून मुख्य सचिव हे पदसिध्द उपाध्यक्ष,विश्वस्त तसेच सहसचिव, महसूल व वन विभाग हे देखील पदसिध्द सचिव व विश्वस्त आहेत.
या समितीच्या नियम व विनियमातील तरतूदीनुसार न्यासाच्या एकूण ९ विश्वास्तापैकी ३ पदसिध्द विश्वस्त वगळता उर्वरित ६ सदस्यांची निवड कोयना भूकंपग्रस्त तालुक्यातील विधानसभा सदस्यातून करण्यात येते. त्याप्रमाणे नव्याने कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे.
दिनांक ११ डिसेंबर, १९६७ रोजी कोयना परिसरात भूकंपामुळे पिडीत व्यक्तीचे कुटुबांचे व तेथील दुर्गम भागाचे पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली “कोयना भूकंप पुर्नवसन निधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या नियम व तरतूदीनुसार न्यासाच्या एकूण ९ विश्वास्तापैकी ३ पदसिध्द विश्वस्त वगळता उर्वरित ६ सदस्यांची निवड करण्यात येते. तसेच २ सन्माननीय विधानसभा सदस्यांच्या निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात येतो.
सन २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राज्यात नवीन मंत्रीमंडळ अस्तित्वात आले असल्याने कोयना भूकंप पुर्नवसन निधी समितीच्या कार्यकारिणीची पुर्नरचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्याच्या मुख्य श्रीमती सुजाता सैनिक पदसिध्द उपाध्यक्ष,पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री, शंभूराज देसाई, (खजिनदार सदस्य),सार्वजनिक बाधकाम मंत्री, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे , आमदार अतुल भोसले
पदसिद्ध सचिव तथा विश्वस्त म्हणून सहसचिव महसूल व वन विभाग (मुद्रांक व नोंदणी), सत्यानारायण बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार शेखर गोविंद निकम ,आमदार सचिन पाटील हे “निमंत्रित सदस्य” म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यामुळे या समितीच्या विश्वस्त मंडळाची पुर्नरचना करण्याची शिफारस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली होती.