गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. दरम्यान, औरंगाबादसह अहमदनगर, अमरावती आणि कोल्हापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या सर्व घटनाक्रमानंतर आता राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दंगली घडवल्या जातील, असं वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे.

भाजपाकडून महाराष्ट्रात दंगलीचं राजकारण केलं जात आहे. यापूर्वी राज्यात सात दंगली घडल्या, हे भाजपाचं कटकारस्थान होतं, असा आरोप खैरे यांनी केला. मुस्लीम आणि दलित बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजुने येऊ नये म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- “…हा माणूस प्रत्यक्षात अत्यंत कृतघ्न निघाला”, वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “भाजप हे महाराष्ट्रामध्ये दंगलीचं राजकारण करत आहे. यापूर्वी राज्यात सात दंगली घडल्या आहेत, हे भाजपाचं कटकारस्थान आहे. राज्यातील दलित आणि मुस्लीम बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजुने येतायत. ते मविआच्या बाजुने येऊ नयेत म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे. हिंदूंना वेगळं भडकवायचं आणि मुस्लिमांना वेगळं भडकवून जातीय तणाव निर्माण करायचा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, असं भाजपाचं कटकारस्थान आहे.”