होमिओपॅथी शिकणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षांचा फार्माकोलॉजी हा अभ्यासक्रम शिकवून त्यांना सेवा देण्यास राज्य सरकार अनुकूल असले तरी आय.एम.ए. या डॉक्टरांच्या संघटनेने त्यास विरोध केला आहे. तो चुकीचा असल्याचे होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. एस. एम. देसरडा, डॉ. पवन डोंगरे यांनी एका पत्रकान्वये म्हटले आहे.
राज्य सरकारने घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील जनतेसाठी आवश्यक असल्याचा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. बहुतांशी मोठय़ा रुग्णालयात होमिओपॅथी शिकलेले डॉक्टरही काम करतात. मात्र, त्यांना पदवी सांगू नका, असे निर्देश दिले जातात. जर फार्माकोलॉजी हा अभ्यासक्रम शिकवून इलाज केला तर ग्रामीण भागातील प्रश्न सुटतील, असा दावा संघटनेने केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2014 रोजी प्रकाशित
होमिओपॅथिक डॉक्टरांना चुकीचा विरोध- डॉ. देसरडा
होमिओपॅथी शिकणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षांचा फार्माकोलॉजी हा अभ्यासक्रम शिकवून त्यांना सेवा देण्यास राज्य सरकार अनुकूल असले तरी आय.एम.ए. या डॉक्टरांच्या संघटनेने त्यास विरोध केला आहे.
First published on: 16-06-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rong opposed to homeopathic doctor dr s m desarda