महाराष्ट्रातही करोनाचे संशयित रुग्ण सापडले असून सध्या सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोशल मीडियावर करोनाची लागण होऊ नये यासाठी काय काळजी घेतली जावी याचे संदेश व्हायरल होत आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची गो करोनाच्या घोषणा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशा घोषणा दिल्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. रामदास आठवले यांनी यानंतर ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. दरम्यान रामदास आठवले यांनी आता करोनावर कविता केली आहे.

काय आहे कविता –
करोना गो ये मैने दिया था नारा,
इसलिए जाग गया था भारत सारा,
करोना जैसे चमक रहा है १०२ देशो मै तारा,
एक दिन हम बजादेंगे करोना के बारा.

यावेळी रामदास आठवले यांनी करोनाची लागण होणार नाही यादृष्टीने आता सगळ्यांनी गंभीर होणं गरजेचं आहे असं आवाहन केलं.

‘Go Corona… Go Corona’ वरुन ट्रोल करणाऱ्यांवर आठवले संतापले –
‘गो करोना… गो… गो करोना… गो’वरुन ट्रोल करण्यात येत आहे, तुमच्यावर टीका होत आहे यासंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला. “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”, असा सवाल उपस्थित करत घोषणाबाजीचं समर्थन केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना करोना गो नाही, तर मग काय करोना या असं म्हणणार आहे का? करोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. करोना गो असंच मी म्हणेन. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. करोना गो म्हणजे करोनाने येथून जावं अशी माझी भूमिका आहे. करोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे,” असं मत आठवलेंनी नोंदवलं.