कराड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कराडमध्ये उद्या रविवारी (दि. ५) विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिस्तबद्ध आणि संघटित हिंदू समाजाचे दर्शन घडविणाऱ्या या संचलनाविषयी शहरात उत्सुकता आहे. शहरातील सर्व नागरिकांनी पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजाचे स्वागत करावे आणि विजयादशमी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महंतेश तुळजनवर आणि विक्रम पवार यांनी केले आहे.

पथसंचलनास सायंकाळी चार वाजता मंगळवार पेठेतील कन्या शाळा येथून प्रारंभ होणार असून, कन्या शाळा ते चावडी चौक, आझाद चौक मार्गे सत्र न्यायालय, विजय दिवस चौक, टाऊन हॉल असा पथसंचालनाचा मार्ग असेल. तर समारोप यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे होणार आहे.

यानंतर सायंकाळी पाच वाजता टाऊन हॉल येथे विजयादशमी उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास उद्योजक आणि अलंकार उद्योग समूहाचे प्रमुख दीपक अरबुणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी पाच ते सात या कालावधीत पार पडेल.

तरी, शहरातील सर्व नागरिकांनी पथसंचलन मार्गावर भगव्या ध्वजाचे स्वागत करावे आणि विजयादशमी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महंतेश तुळजनवर आणि विक्रम पवार यांनी केले आहे. पथसंचलनास सायंकाळी चार वाजता मंगळवार पेठेतील कन्या शाळा येथून प्रारंभ होणार असून, कन्या शाळा ते चावडी चौक, आझाद चौक मार्गे सत्र न्यायालय, विजय दिवस चौक, टाऊन हॉल असा पथसंचालनाचा मार्ग असेल. तर समारोप यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे होणार आहे.