राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना या वर्षीपासून सहकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, या पुरस्कारांची घोषणा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केली. सहकार क्षेत्रात हे पुरस्कार मानाचे समजले जातात़
पहिला सहकारमहर्षी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्य़ातील यडगुळ येथील श्री. हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषी पूरक सेवा संस्था मर्यादित (हातकणंगले तालुका) यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर सहकारभूषण व सहकारनिष्ठ पुरस्कारही यावेळी जाहीर करण्यात आले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्षे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने या वर्षीपासून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना पुरस्कार देऊन शासनाकडून सन्मानित करण्यात येणार आहे. सहकारमहर्षी पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र, तर सहकार भूषण पुरस्काराचे स्वरूप रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि सहकारनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.
येत्या २ डिसेंबर रोजी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
सहकारभूषण पुरस्कारप्राप्त संस्थांची नावे-
१)कोकण विभाग-
आदर्श नागरी सहकारी पतसंस्था (अलिबाग) आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था (रत्नागिरी)
२) नाशिक विभाग- काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी (काष्टी, ता. श्रीगोंदा)
३) पुणे विभाग- श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था (रविवार पेठ, पुणे)
४) कोल्हापूर विभाग – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कोल्हापूर)
५) औरंगाबाद विभाग- घृष्णेश्वर सहकारी ग्राहक संस्था (औरंगाबाद)
६) लातूर विभाग- महाराष्ट्र वीज कामगार सहकारी पतसंस्था
(निलंगा, जि. लातूर)
७)अमरावती विभाग – नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था (नेरपिंगळाई. जि. अमरावती)
८) नागपूर विभाग –
भवभूती शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था (आमगांव, जि. गोंदिया)
९) राज्यस्तरीय विभाग- आशीर्वाद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (मुलुंड/गोरेगाव, पश्चिम मुंबई)
सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त संस्थांची यादी-
१) कोकण विभाग-
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ठाणे),
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
(अलिबाग)
२) नाशिक विभाग-
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (संगमनेर), सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी संस्था
(सटाणा, जि. नाशिक)
३) पुणे विभाग-
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना (अकलूज, जि. सोलापूर), श्री चौंडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी सहकारी पतपेढी (सोलापूर)
४) कोल्हापूर विभाग-
राजाराम बापू पाटील सहकारी दूधसंघ (इस्लामपूर, जि. सांगली), कोयना कृषक सेवा सहकारी संस्था (मल्हार पेठ, जि. सातारा)
५) औरंगाबाद- देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था (जालना), समर्थ सहकारी साखर कारखाना (अंकुशनगर, जालना)
६) लातूर विभाग-
विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (चाकूर, जि. लातूर), विकास सहकारी साखर कारखाना (वैशालीनगर, लातूर)
७) नागपूर विभाग- भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (भंडारा), वणी नागरिक सहकारी बँक (हिंगणघाट, जि. वर्धा)
८) राज्यस्तरीय विभाग – भगिनी निवेदिता सहकारी बँक (नारायण पेठ, पुणे), सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (जिंतूर, परभणी).
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
राज्यातील सहकार पुरस्कारांची घोषणा
राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना या वर्षीपासून सहकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून, या पुरस्कारांची घोषणा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केली. सहकार क्षेत्रात हे पुरस्कार मानाचे समजले जातात़
First published on: 29-11-2012 at 05:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahakar award announcefirat sahakarmaharshi award goes to one of kolhapur institute