कोल्हापूर आणि सांगली शहरात पुरामुळे बरेच नुकसान झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यासाठी अनेक मराठी कलाकार पुढे सरसावले असून प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. मदत करणाऱ्यांच्या यादीत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा सहभाग झाला आहे. मंजुळेंनी पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा पाच लाखांचा चेक सोपवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून नागराज मंजुळेंनी केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, “नागराज मंजुळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”.

कृष्णा-पंचगंगा नदीला आलेल्या प्रलयकारी महापुरामध्ये कोल्हापूर, सांगलीचे मोठे नुकसान झाले. पुराच्या या तडाख्याने या दोन्ही शहरांबरोबरच परिसरातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली. आपल्या बांधवांवर कोसळलेल्या या आपत्तीची वार्ता कळताच राज्य आणि राज्याबाहेरून मदतीचा ओघ वाहू लागला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat director nagraj manjule donated five lakh rupees to maharashtra cm flood relief fund ssv
First published on: 28-08-2019 at 16:08 IST