तपास पथकाची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडे चौकशी

भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी पुण्याहून आलेल्या पोलिसांच्या तपास पथकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची देखील चौकशी केली आहे. या चौकशीत या पदाधिकाऱ्याने दंगलीच्या दिवशी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्या मातोश्रीच्या रक्षाविसर्जनासााठी ४ तास उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे करण्यात आलेल्या या चौकशीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ज्या तक्रारअर्जाच्या आधारे दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये संबंधित तक्रारदार महिलेने आपण या दंगलीवेळी भिडे गुरुजी यांना दगड मारताना पाहिले असल्याचे म्हटले आहे. यावरून भिडे गुरुजी त्या दिवशी नेमके कुठे होते, याबाबतची चौकशी पोलीस पथक करत आहेत. या अंतर्गतच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याकडे वरील चौकशी केली आहे.  ज्या दिवशी दंगल झाली, त्या दिवशी भिडे गुरुजी आ. पाटील यांच्या मातोश्रींच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी कासेगाव (ता. वाळवा) येथे उपस्थित होते. या विधीच्या वेळी तसेच यानंतर जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी असे ते चार तास या गावी उपस्थित होते असे राष्ट्रवादीच्या या नेत्याने तपास पथकाला सांगितले आहे. याबाबतचे तपशील, पुरावे देखील पोलिसांनी जमा केल्याचे समजते.