रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे घराच्या मागील बाजूस अडकून पडलेल्या बिबट्याला जखमी अवस्थेत वन विभागाच्या पथकाने पिंजरा लावून पकडले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलेच भितिचे वातावरण पसरले. साडवली कासारवाडी येथील राजेंद्र धने यांचे राहत्या घराच्या मागील बाजूस बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील साडवली यांनी वन विभागाला दिली. मिळालेली माहितीनुसार, वन विभागाच्या पथकाने साहित्यासह घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, बिबट्या घराच्या मागील जागेत एका ठिकाणी बसलेला आढळून आला. त्याला सुरक्षित रित्या पिंजरा लावून ताब्यात घेतले.
जखमी बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक श्री. युवराज शेट्ये व वन्यजीव पशुवैद्यक कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर श्री. संतोष वाळवेकर यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे तीन ते चार वर्षे वय आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर उपचार केले. यावेळी सहायक वनसंरक्षक रत्नागिरी – चिपळूण श्रीमती प्रियंका लगड परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक रत्नागिरी-चिपळूण श्री. जितेंद्र गुजले, वनपाल संगमेश्वर देवरुख, श्री. सागर गोसावी, सारिक फकीर वनपाल लांजा, वनरक्षक फुणगूस श्री. आकाश कडूकर, वनरक्षक साखरपा श्री. सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे श्रीमती सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली श्री. सुरज तेली, वनरक्षक लांजा श्रीमती नमिता कांबळे, वनरक्षक कोरले श्रीमती श्रावणी पवार, वनरक्षक राजापूर फिरते पथक श्री. विशाल पाटील, वनरक्षक फिरते पथक श्री. दत्तात्रय सुर्वे वनरक्षक वन तपासणी नाका साखरपा श्री. रणजीत पाटील पोलीस पाटील साडवली व ग्रामस्थ हे उपस्थित होते.