संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे शहर व परिसरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साई शरद सूर्यवंशी (वय २०) राहुल भरत सोनवणे (वय २४), आदित्य संपत सूर्यवंशी (वय २७, तिघे रा. अकोले नाका, संगमनेर), पिल्या विक्रम रामनाथ घोडेकर (वय २७, पंपिंग स्टेशन, संगमनेर), सिद्धार्थ दीपक मावस (वय २२, खांडगाव, संगमनेर), प्रशांत उर्फ परशा दीपक मावस (वय १९, खांडगाव, संगमनेर), सौरभ पप्पू खर्डे (वय १९, गणेशवाडी, संगमनेर) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींकडून खुनाचा प्रयत्न, दरोडा, लुटमार असे गंभीर गुन्हे उघडकीस आल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. या कारवाईमध्ये उपनिरीक्षक समीर अभंग व संतोष पगारे, अंमलदार संदीप शिरसाट, अजित कोरे, संतोष भास्कर, सुरेश मोरे, अतुल मुंडे, हरिश्चंद्र पांडे, आत्माराम पवार, राहुल डोके, राहुल सारबंदे यांनी सहभाग घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मोक्का’न्वये कारवाई

अटक केलेल्या आरोपीविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या गुन्हेगारांकडून संगमनेर शहरातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली.