सांगली : सांगलीतील उषकाल रुग्णालयाबाबत पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी मिळाली.

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

याबाबत माहिती अशी, इनाम धामणी रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी उषकाल मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये मिळणार्‍या वैद्यकीय सेवेच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी रुग्णालयाचे कायदा सल्लागार अ‍ॅड. सुशिल मेहता यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून संपर्क साधून २५ लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणीची रक्कम दिली नाही म्हणून एका स्थानिक वृत्त वाहिनीवर रुग्णालयाची बदनामी करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी राहूल शहा, संपदा शहा व यश शहा यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी दिली आहे.