सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील पुरस्कृत शेतकरी पॅनेलने २१ पैकी १५ जागा जिंकत जिल्ह्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम पुरस्कृत रयत पॅनेलला केवळ सहा जागांवरच विजय मिळाला. या निवडणुकीत माजी मंत्री आणि शेतकरी पॅनेलचे उमेदवार मदन पाटील यांचा त्यांचे चुलत बंधू विशाल प्रकाशबापू पाटील यांनी चार मतांनी पराभव केला. विशाल पाटील हे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचे धाकटे बंधू आहेत.
निवडणुकीतील सर्व २१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. शेतकरी पॅनेलला १५ तर रयत पॅनेलला सहा जागांवर विजय मिळाला. भाजपचे सांगलीतील खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणुकीत शेतकरी पॅनेलमधून विजय मिळवला. खानापूरमधील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे देखील या निवडणुकीत शेतकरी पॅनेलमधून विजयी झाले आहेत. कडेगावमधून रयत पॅनेलचे मोहनराव कदम विजयी झाले. तर पलूसमधून याच पॅनेलच्या महेंद्र लाड यांना विजय मिळाला. कवठेमहांकाळमधून शेतकरी पॅनेलचे गणपती सगरे, आटपाडीतून उदयसिंग देशमुख निवडून आले. शिराळामधून मानसिंगराव नाईक आणि वाळव्यातून दिलीप तात्या पाटील हे शेतकरी पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli district bank election update
First published on: 07-05-2015 at 11:28 IST