सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात ६८१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यातून ३६ हजार ७७८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी तर, विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या २ हजार २७६ रुग्णांना पुढील उपचाराकरिता तज्ज्ञ डॉयटरांकडे संदर्भित करण्यात आले.
यासंदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे कक्षप्रमुख रामेडर नाईक म्हणाले, गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्डभूमिवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून सांगली जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तर, विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने आणि जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सांगली व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष संलग्नित असलेली रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रुग्णालये, जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये तसेच स्टेमी व एच.एल.एल. यंत्रणेच्या सहकार्याने ही समुदाय आरोग्य शिबिरे यशस्वी करण्यात आली. या शिबिरांमधून उङ्ख रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२५’ हे अभियान दिनांक २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात आले. याअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये ६८१ इतकी समुदाय आरोग्य शिबिरातून ३६७७८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ३६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच, २६९६ नागरिकांना आभा कार्ड वितरित करण्यात आले.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांचे मार्गदर्शन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या डॉ. मनिषा पाटील यांचा समन्वय व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे डॉ. रोहित खोलखुंबे, डॉ. सुभाष नांगरे, लक्ष्मण कुंडले यांचे सहकार्य लाभले. गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. त्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.