सांगली : मिरजेच्या किल्ला परिसरात सदनिकेचे काम सुरू असताना भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. कोणत्याही सुरक्षा साधनाविना मजूर काम करत असल्याचे आढळून आले असून, बांधकाम ठेकेदार मात्र परागंद झाला आहे.
मिरजेत किल्ला भागात खुशी वन अपार्टमेंट या सदनिकेचे बांधकाम सुरू आहे. इमारत उभारण्यासाठी तळात दहा फूटहून अधिक खोदाई करण्यात आली आहे. या ठिकाणी सिमेंटचा पाया व खांब बांधण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी एक वाजणेच्या सुमारास मजूर तळात काम करत असतानाच शेजारी असलेली विटांची भिंत कोसळली. यामध्ये सात मजूर दबले गेले. तातडीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पैकी भिमाप्पा मेकळगी यांची स्थिती अत्यवस्थ असून, अन्य जखमींमध्ये केदार निंगनूर, सहदेव मदार, रायाप्पा, बिराप्पा करगणी आणि मुत्याप्पा माटेकर यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर कर्नाटकातील आहेत.
मिरजेत बांधकाम सुरू असताना अपघात घडल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मृत कामगाराचे नाव मात्र सायंकाळपर्यंत समजले नाही. गंभीर जखमी झालेल्या भिमाप्पा मेकळगी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, बांधकाम ठेकेदाराचा शोध सुरू केला आहे.
मिरजेत किल्ला भागात खुशी वन अपार्टमेंट या सदनिकेचे बांधकाम सुरू आहे. इमारत उभारण्यासाठी तळात दहा फूटहून अधिक खोदाई करण्यात आली आहे. या ठिकाणी सिमेंटचा पाया व खांब बांधण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी एक वाजणेच्या सुमारास मजूर तळात काम करत असतानाच शेजारी असलेली विटांची भिंत कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पैकी भिमाप्पा मेकळगी यांची स्थिती अत्यवस्थ असून, अन्य जखमींमध्ये केदार निंगनूर, सहदेव मदार, रायाप्पा, बिराप्पा करगणी आणि मुत्याप्पा माटेकर यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर कर्नाटकातील आहेत.
या घटनेतील जखमींना उपचारासाठी तातडीने मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. कोणत्याही सुरक्षा साधनाविना मजूर काम करत असल्याचे आढळून आले असून, बांधकाम ठेकेदार मात्र परागंद झाला आहे.