सांगली : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीत पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या सुलतान व राम्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या शर्यतीस प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये होते. तर प्रकाश देवकाते यांच्या तांबड्या हारण्या बैलजोडीने दुसरा तर नामदेव जानकर व राजदीप थोरात यांच्या गुलब्या व कॅडकरी या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला. ब गटाच्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे बाबर शेठ, संतोष पांढरे व सागर घागरे यांच्या बैलजोडीने पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्यचे समित कदम यांच्या उपस्थितीत शर्यतीस प्रारंभ करण्यात आला. राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्यावतीने भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील, राकेश कोळेकर यांनी शर्यतीचे आयोजन केले होते. अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.