सांगली : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी सांगली, मिरजेसह इस्लामपूरमध्ये साजरी करण्यात आली. जयंती निमित्त छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समता दिंडी व सामाजिक समता चित्ररथ रॅली काढण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर समता दिंडी काढण्यात आली. ही समता दिंडी सांगली बसस्थानक येथून सुरू होऊन पुढे राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात रॅलीची सांगता झाली.यावेळी संविधान जनजागृती अभियानअंतर्गत संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, राहुल जाधव, अमृता लिमये, तुषार शिवशरण व विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
काँग्रेस समितीच्या कार्यालयात शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प्हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. एन.डी. बिरनाळे, अजित ढोले, मौलाली वंटमुरे, पेैगंबर शेख, अरूण गवंडी, शमशाद नायकवडी, मीना शिंदे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनेही कार्यालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मिरज शहरात राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ. इद्रिस नायकवडी, माजी आमदार अजितराव घोरपडे, जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे धनंजय भिसे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, जहीर मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शाहू राजांनी शेतकरी, कामगार, मागासवर्गीय समाज, पैलवान, महिला, कलाकार आदी विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे कार्य केले आहे, ते आपण कधीही विसरू शकत नाही, अशी भावना तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी व्यक्त केली.