सांगली : सांगली पोलीस दलाला तपासात महत्वपूर्ण मदत करणाऱ्या गुन्हे शोध पथकातील डॉबरमन जातीच्या कुपर श्वानाचा मंगळवारी सकाळी ह्दयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कूपर श्वानाने प्रशिक्षणानंतर १० जानेवारी २०२० पासून काल अखेर तपास कार्यात महत्वाची भूमिका बजावली.
कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्हयातील पोलीस ठाण्याकडुन आलेले ३६४ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवुन त्यापैकी १३ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाचे सहकार्य केले. २०२१ मध्ये जत व २०२२ मध्ये हरीपुर गावातील खुनाच्या गुन्हयांमध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखुवन तपास कामी महत्वाचे सहकार्य केले होते. आटपाडी येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये कुपर श्वानाने आरोपींचे दाखविलेल्या मागामुळे संशयित आरोपीस अटक करुन त्याचेकडुन साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करणेत यश मिळाले होते.
या वर्षी कुपर श्वानाने एकुण ३८ गुन्हयांचे तपासामध्ये आरोपींचे माग दाखवुन तपास कामी सहकार्य केले होते. कुपर श्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेवुन सांगली जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांचे हस्ते त्याचा सत्कार करणेत आला होता. तसेच मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे हस्ते २ वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करणेत आला होता.
तपास कार्य बजावत असताना सोमवारी त्याने अचानक जेवण करणे बंद केल्याने त्याच्यावर मिरजेतील पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना, मिरज येथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले.
त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोक सलामी देवुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कूपरचे श्वानाचे पालक पोलीस कर्मचारी सुहास भोरे, शबाना अत्तार उपस्थित होते.
कुपर श्वानाचे सेवाकार्य
कुपर श्वानाने त्याचे सेवा काळात जिल्हयातील १३ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाचे सहकार्य केले. २०२१ मध्ये जत व २०२२ मध्ये हरीपुर गावातील खुनाच्या गुन्हयांमध्ये कुपर श्वानाने आरोपीचा माग दाखुवन तपास कामी महत्वाचे सहकार्य केले होते. आटपाडी येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये कुपर श्वानाने आरोपींचे दाखविलेल्या मागामुळे संशयित आरोपीस अटक करुन त्याचेकडुन साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करणेत यश मिळाले होते.