सांगली : भोसे (ता. मिरज) येथे झालेल्या राज्यस्तरीय दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेत खुल्या पुरुष गटातून सांगलीच्या अभिनंदन सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक, तर अंकुश हाके सलगरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर, कराडच्या इंद्रजित कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

महिलांच्या ४५ वर्षांवरील गटातून कविता जाधव मिरज यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर संगीता कांबळे कोंगनोळी यांनी द्वितीय आणि मंगल माळी सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला. कवठेमहांकाळ येथील महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन, क्रीडा प्रशिक्षक, आजी-माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. महिला, पुरुष, मुले, मुली अशा विविध गटांत या स्पर्धा पार पडल्या. शंभराहून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंंदवला.

पुरुषांच्या ४५ वर्षांवरील गटातून हणमंत शिंदे सांगोला यांनी प्रथम क्रमांक, तर सुभाष पवार उपळावी यांनी द्वितीय, तर शिवाजी तुकाराम पाटील येळावी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. खुला महिला गटातून सहा किलोमीटर या स्पर्धेत शीतल मोहिते कडेगाव यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर आराधना वावरे देशिंग यांनी द्वितीय, तर प्रतीक्षा चरणकर सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

मुलांच्या अठरा वर्षांखालील गटातून अथर्व ताटे कराड याने प्रथम, तर बिरुदेव कोळेकर सांगली यांनी द्वितीय, यश दुधाळ सांगली यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटामध्ये निशा कुमार पवार मंगळवेढा यांनी प्रथम, रिया गोंडाळ कराड हिने द्वितीय, तनुजा सोळांकुरकर सांगली हिने तिसरा क्रमांक पटकाविला.

उद्योगपती पोपट जगताप यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राहुल कोठावळे, शौकत मुलाणी, रामचंद्र पाटील, कैलास शिंदे, अरविंद बुडके, राजू शिरोळकर, विष्णू गावडे, धनाजी पुजारी, ईर्शाद सावनूरकर, युवराज देशमुख, सुभाष माने, गोरख बंडगर, रवींद्र वांगीकर, सचिन चौगुले, वसंत पाटोळे, राधिका गावडे, वर्षाराणी स्वामी, अडिनी दुकानदार, रुपाली कांबळे आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.