महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाची निवडणूक ही खूप चुरशीची ठरली. पक्षफुट, बंडखोरी, तसेच, मराठा आणि ओबीस आरक्षण यासह इतर विषयांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. आज निकालातही महाविकास आघाडी ही महायुतीपेक्षा अधिक जागा घेत पुढे असल्याचे चित्र आहे. दरम्यान सांगलीत महाविकास आघाडीला धक्का बसला असून, अपक्ष उमेदवार तसेच काँग्रेसचे माजी नेते विशाल पाटील हे या मतदारसंघात आघाडीवर आहे.

मिळालेल्या यशाबद्दल विशाल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला. सांगली मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. सेवटी सांगलीची जागा ही शिवसेनेला गेली. शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर जागा शिवसेनेला सुटल्याच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अपक्ष लढण्याची घोषणा केली. आज सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालात विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या प्रसंगी विशाल पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळेच…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “बाप हा बाप असतो”!

विटा शहरात मताधिक्य आहे. सांगलीतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी पाठीशी आहे. हा जनतेचा विजय असून ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांना धमक्या देण्यात आल्या. मी तुमच्या पाठीशी आहे. ज्यांनी मतदान दिले नाही. त्यांच्याविषयी कुठलेही आकस नाही. सर्वांसाठी काम करणार. माझ्या विजयात सर्वांचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली. दरम्यान विशाल पाटील अपक्ष लढले असले तरी काँग्रेसचेच आहेत, असं त्यांच्या पत्नीने म्हटले आहे.

हेही वाचा – “सोनं कोणाकडे आहे आणि दगड कोणाकडे आहे, हे जनतेने दाखवून दिले” जितेंद्र आव्हाडांनी महायुतीवर ओढले ताशेरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाचे लोकसभा निवडणुकीचे परिणाम हे २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकीच्या अगदी वेगळे आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधकांना चांगलाच फटका बसला होता. मात्र यंदा विरोधकांची एकत्रित इंडिया आघाडीने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चुरशीची लढत दिली आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी ते ३०० च्या खाली आहे. तर इंडिया आघाडीने दोनशेच्यावर जागा मिळवल्या आहेत.