महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील पदाधिकारी आणि फायरब्रँड नेते म्हणून माजी नगरसेवक वसंत मोरे यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून मनसेबाबत त्यांची नाराजी होती. अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले आहे. काल रात्रीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून पक्ष सोडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला राम राम केल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर मनसेच्या पुर्वाश्रमीच्या पुण्यातीलच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एका छोट्याश्या कवितेतून वसंत मोरे यांची कुचंबणा होत असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच त्यांना राष्ट्रवादीत (अजित पवार गट) येण्याचे आवाहन केले आहे.

मोठी बातमी! वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट

MNS, Mahayuti campaign, Pune, MNS pune,
पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील?

“वसंत मोरे यांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करते. लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटत होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या होत्या. हा निर्णय घ्यायला त्यांनी उशीरच केला, असंच मी म्हणेण. “लोकांची पसंत असलेले, मोरे वसंत, मनसेला नव्हते पसंत”, अशा शब्दात मनसेच्या माजी नेत्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वसंत मोरेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आपले स्वागत करू, असे सांगून रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रणच दिले आहे.

“एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” अशी पोस्ट वसंत मोरेंनी रात्री केली होती. त्यानंतर आज राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मोरेंनी वॉशिंग मशीनकडे जाऊ नये

वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर मत व्यक्त करताना राऊत म्हणाले, मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी का दिली? याबद्दल त्यांनीच प्रतिक्रिया दिली पाहीजे. ते लोकसभा लढविणार असतील तर कोणाकडून लढविणार आहेत? आमची एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. कारण ते स्वतःच स्वच्छ आहेत. पुण्यामध्ये जरे रवींद्र धंगेकर आहेत, तसे माझ्या माहितीप्रमाणे वसंत मोरे आहेत.”