ठाकरे गटाकडून आज (शनिवार) मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके जे काही कारस्थान करत आहेत, ते कारस्थान उधळून लावण्यासाठी हा मोर्चा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ते ठाकरे गटाच्या महामोर्च्यात बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “ही मुंबई शिवसेनेची आहे. ही मुंबई महानगरपालिकाही शिवसेनेच्या बापाची आहे, हे लक्षात ठेवा. गेल्या ३०-३५ वर्षात शिवसेनेवर भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी फडकवत ठेवला. हा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके जे काही कारस्थानं करतायत, ती उधळण्यासाठी हा मोर्चा आहे. या महाराष्ट्रावर आणि मुंबईवर कायम शिवसेनेचंच राज्य राहील, हे सांगणारा हा मोर्चा आहे. सध्या महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याविरोधातला हा मोर्चा आहे. शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचं राज्य, नगरसेवकांचं राज्य जोरजबरदस्तीने काढून घेतल्यापासून महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे, या भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा आहे.”

हेही वाचा- समृद्धी महामार्ग बस अपघात: घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अपघातग्रस्तांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भारतीय जनता पक्षाची खास करून मोदी, शाह, फडणवीस आणि मिंधे-फिंधे यांची एकच इच्छा आहे. भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभीमानाने भ्रष्टाचार करा. शिवसेनेत किंवा काँग्रेस पक्षात राहाल तर तुरुंगात जावं लागेल. पण अत्यंत बेधडकपणे आज इथे लाखोंच्या संख्येनं मुंबईकर जमले आहेत. या मुंबईकरांचं एकच सांगणं आहे, निवडणुका घ्या… निवडणुका घ्या” अशी टीका संजय राऊतांनी केली.