scorecardresearch

Premium

“ते स्वभावाने फटकळ आहेत पण…”; गडकरींच्या वाढदिवसाच्या दिवशीच संजय राऊतांचं वक्तव्य

संजय राऊत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज गडकरींचा ६५ वा वाढदिवस असल्याने ते गडकरींबद्दल बोललेत

sanjay raut on nitin gadkari
sanjay raut on nitin gadkari: कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं वक्तव्य (फाइल फोटो)

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार आहे. मागील काही काळापासून भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु असल्याने दोन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र आज हे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौैतुक केलं. आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी गडकरींना शुभेच्छा देताना मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जातोय त्यापैकी ९० टक्के कामं गडकरींनी केल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> Birthday Special: नितीन गडकरींना YouTube कडून महिन्याला किती पैसे मिळतात?; स्वत:च म्हणाले होते, “आज मला महिन्याला…”

“जो विकास दिसतोय ज्या विकासाची चित्र दाखवली जातायत त्यापैकी ९० टक्के काम नितीन गडकरींचं आहे. रस्ते असतील, उड्डाणपूल असतील. अगदी देशाच्या सीमेपर्यंत काम केलंय. उत्तम रस्ते तयार झालेत, उड्डाणपूल तयार झालेत, दळणवळणाची साधने तयार झालीयत, याचं श्रेय नितीन गडकरींनाच द्यावं लागेल,” असं म्हणत राऊत यांनी गडकरींचं कौतुक केलंय.

Dhananjay-Munde-13
पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे
sambhaji bhide godse
साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार
Ganpati Visarjan 2023
पुढच्या वर्षी लवकर या..! लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप
dcm fadnavis handover 5 lakh cheque to the ankita parents
हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिताच्या कुटुंबास ५ लाखाची मदत; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित

“साधा माणूस आहे पण विकासाचा दृष्टीकोन आहे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा राष्ट्रीय शरद पवार यांच्यानंतरचा जर कोणी नेता असेल तर नितीन गडकरी आहेत,” असंही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, “ते (गडकरी) महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान काय हे नितीन गडकरींनी मागील सात वर्षात केलेल्या कामातून स्पष्ट दिसेल,” असंही राऊत यांनी गडकरींचं कौतुक करताना म्हटलंय.

नक्की वाचा >> २५ कोटी, कढी भात अन् अजित पवार… राष्ट्रवादीच्या नेत्यानेच जाहीर सभेत सांगितला ‘तो’ किस्सा; गडकरींनी हसून दिली दाद

“गडकरी हे भाजपाचे नेते असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता हा त्यांचा चाहता आहे. टीका टीप्पणी होत असते पण गडकरींच्या टीका टीप्पणीमध्ये कधी विखार नसतो. ते स्वभावाने फटकळ आहेत पण मानाने निर्मळ आहेत. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड, निरोगी दिर्घायुष्य चिंतितो,” असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, कोल्हापूर दौऱ्याबद्दल बोलताना राऊत यांनी, “कोल्हापूरची जाबदारी माझ्यावर पक्षप्रमुखांनी दिलीय. तीन दिवस मेळावे, बैठका, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रयत्न करु” असं म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut says 90 percent of work by modi government belongs to nitin gadkari scsg

First published on: 27-05-2022 at 10:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×