महाराष्ट्रामधील केंद्रीय मंत्री शरद पवारांसारख्या व्यक्तीला धमकावत असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करतानाच नारायण राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा देताना ट्विटरवरुन केलेल्या ‘…तर घर गाठणे कठिण होईल’ वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> “सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवारांबाबत…”; नारायण राणेंनी पवारांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावरुन राऊत संतापले

पवार काय म्हणाले?
राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या शरद पवारांना धमकीवाजा इशारा दिल्याने राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणे कठिण होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं होतं. या वक्तव्यावर राऊत यांनी आक्षेप घेतलाय. आधी फेसबुकवरुन आणि नंतर प्रत्यक्षात पत्रकारांसमोर या मुद्द्यावरुन राऊत यांनी थेट भाजपाला सवाल केलाय.

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

राणेंनी काय म्हटलं?
महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी पवारांना लक्ष्य केलं. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असं ट्विट राणेंनी केलं.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य

माज वाढला आहे म्हणत राऊतांकडून टीका…
सध्या राज्यामधील सत्ता वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना केंद्रीय मंत्र्यांकडून घरी जाऊ देणार नाही अशाप्रकारच्या धकम्या दिल्या जात असून हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलंय. “आता लोक धमक्या देतायत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. देऊ द्या हरकत नाही. ही त्यांची संस्कृती आहे. पण ही भाजपाची संस्कृती आहे का असा मी प्रश्न विचारलाय,” असं राऊत म्हणालेत.

थेट मोदी आणि शाह यांचा केला उल्लेख
“शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देणारा कोणी महाराष्ट्रात असेल तर त्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना करावा लागेल. या देशात लोकशाही, स्वातंत्र्य आहे. शरद पवारांसारख्या नेत्याचा आदर पंतप्रधान मोदी करतात, जगभरात त्यांना मान आहे अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळावयचीय चोरीच्या मार्गाने म्हणून अशा धमक्या देणं चुकीचं आहे. आम्हाला द्या धमक्या आम्ही समर्थ आहोत. पण त्यांच्या वयाचा, अनुभवाचा, तपस्येचा तुम्हाला आदर नसेल तर मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून घ्याला नालायक आहोत,” असा टोला राऊत यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणेंना लागवलाय. तसेच मोदी आणि शाह यांनी यासंदर्भात भाजपाची भूमिका काय हे महाराष्ट्राला सांगावं, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.

फेसबुकवरुनही टीका
राणेंच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत फेसबुकवरुन एक पोस्ट केली असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाला टॅग केलं आहे. “महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

राणेंनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं
पवारांवर टीका करण्याबरोबरच गुरुवारी रात्री नारायण राणेंनी अन्य दोन ट्विट करत शिवसेनेलाही लक्ष्य केलं. “आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा,” असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राणेंच्या वक्तव्यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही भाजपाची भूमिका नसून पक्षाची भूमिका मी मांडत असतो, असं म्हणत या वक्तव्याचा पक्षाच्या भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचे संकेत दिलेत.