राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चांच्या फेऱ्या होत असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगात आल्याचं दिसत आहे. आता काही महिन्यांत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार असल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सरकारमध्ये गेलेल्या गटांविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी टोला लागावल्यानंतर त्यावर आता पुन्हा संजय राऊतांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमका वाद काय?

संजय राऊतांनी आक्रोश मोर्चामध्ये केलेल्या भाषणात अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. “मी एक वक्तव्य ऐकलं, ‘काहीही झाले तरी मी तुम्हाला पाडणारच…’. पण, आमच्या पाडा पाडीच्या खेळात पडलात, तर पहिले तुम्ही पडाल. नाव घेऊन बोलायचं असतं. आमच्यात दम आहे. ‘हवा बहोत तेज चल रही है, अजितराव.. टोपी उड जाएगी”, असं संजय राऊत म्हणाले होते.

Thane Police, Thane Police Issue Notices to NCP office bearers , Jitendra awhad, Jitendra awhad Opposes Move, lok sabha 2024, thane lok sabha seat, thane news,
प्रतिबंधात्मक नोटीसांच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा ठाणे पोलिसांना इशारा
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…

संजय राऊतांच्या या विधानावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. आज सकाळी पेरणे फाटा येथील विजयस्तंभावर अभिवादन केल्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊतांच्या टीकेबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी “सल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही”, असं म्हणत तो प्रश्न उडवून लावला.

संजय राऊतांची खोचक टीका!

दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा त्यांना लक्ष्य केलं आहे. “त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे, जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. यापेक्षा जास्त मला बोलण्याची गरज नाही. २०२४ ला सोमेगोमे कोण हे कळेल”, असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

“अजितराव… टोपी उड जायेगी”, संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “असल्या सोम्यागोम्याने..”

“महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, राज्याचे उद्योग, रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान हो असताना सध्याच्या सरकारमधले हौशे, नौशे, गौशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर किंवा इतर कुणावर बलण्याचा अधिकारच नाही. इतके नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाले नसतील. फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपटतायत ते काय आमच्यावर बोलतायत? त्यांनी बोलूच नये”, असं राऊत म्हणाले.