शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंसह गेलेल्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत फक्त शिवसैनिकांनाच स्थान आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दहिसर येथे शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह रस्ता बदलतात, असेही म्हटले आहे.

“संजय राऊत कोणी नाही. पण शिवसेना या चार अक्षरांनी आम्हाला राष्ट्रीय नेता केले आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे तो शिवसेनेमुळे म्हणतात. आम्हाला पाहिल्यावर याच्या नादाला लागायला नको म्हणून मोदी आणि शाह रस्ता बदलतात. कोणाची हिंमत नाही आमच्या हाताला धरुन बाजूला खेचायची. हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे याच्या नादाला लागू नका म्हणतात. याच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

Maharashtra political crisis: रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोर आमदारांच्या पत्नींशी साधतायत संपर्क

गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील

“जर आपण महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर गुवाहाटीला बसलेले ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेमधील ही कीड कायमची संपून जाईल. त्यांना शिवसेनेने काय नाही दिले. अनेकांवर अन्याय करत त्यांना संधी दिली आहे. पण आता हे होणार नाही. असा अन्याय होईल तेव्हा आमच्यासारखे लोक उभी राहितील आणि सांगतील की हे होता कामा नये. हे लोक कुठून येतात आणि यांना कोण आणतं हे मला सगळं माहिती आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

सांगोल्याला डोंगर झाडी नाही का? संजय राऊतांचा शहाजीबापू पाटलांना टोला

महाराष्ट्राचा आणि देशाचे बिग बॉस बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

“गुलाबराव पाटील आता परत पानटपरीवर बसतील. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही हा इतिहास आहे. संदिपान भुमरेंना तिकीट मिळाले तेव्हा ते साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यानंतर ते मुंबईला आहे. त्यांना वडा सांबर खाता येत नव्हते. जमिनीवर बसून वडा सांबर खात होते आणि आज ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडे गेले. त्यानंतर माझ्याकडे आले. त्यावेळी ते शिवसेनेने मला मोठे केले असं म्हणत रडत होते. ते अश्रू खोटे होते ते आता कळले आहे. महाराष्ट्राचा आणि देशाचे बिग बॉस कोणी असतील तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत. ज्यांना जायचे आहे त्यांना जावू द्या. प्रकाश सुर्वे भाजी विकत होते. आता परत त्यांना भाजी विकायला पाठवूया. प्रकास सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बिल नेमकं भरतंय कोण? आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

ती आता चड्डी बनियान टोळी झाली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गुवाहाटीमध्ये त्यांनी काल रात्री एकमेकांचे कपडे फाडल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी गुवाहाटीमधील दुकाने उघडल्यानंतर सकाळी चड्डी बनियान आणायला सांगितले. ती आता चड्डी बनियान टोळी झाली आहे. शिवसेना कोणाला नष्ट करता येणार नाही. मला जे बोलायचे आहे ते मी बोललो आहे. मी सतत बोलत राहतो आणि मला बोलावेच लागेल. शंकरराव बोरकर मान हलवू नका. भूम पराड्यांला जा तिथे एक लफंगा पळून गेला आहे. नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडेचं. हे सगळं थांबले पाहिजे आणि आपल्यातील गद्दार शोधले पाहिजेत,” असा कानमंत्र संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना दिला.