१९ जूनला शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून वर्धापनदिनाची जोरात तयारी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून टीझर लाँच करण्यात आला आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टोलेबाजी केली आहे. ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी शिंदे गटावर केला आहे.

शिवसेना ( शिंदे गट ) नेते नरेश मस्के यांनी टीझर ट्वीट केला आहे. त्या व्हिडीओत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहे.

हेही वाचा : “चीनशी लढण्याची ताकद नाही, म्हणून…”, मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

यावर संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा १९ जूनला वर्धानपदिन आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. गावच्या जत्रेत तंबू असतात. तंबूत खोटा चंद्र आणि मर्सिडीज गाडी असते. लोक त्या चंद्रावर बसून फोटो काढतात. तशी खोटी शिवसेना आपल्या पाठीमागे लावून फोटो काढत टीझर प्रसिद्ध केले जातात.”

हेही वाचा : “…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते,” प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जिथे आहेत, ती शिवसेना आहे. बाकी जत्रा संपल्यावर तेथील तंबू उठतात. तसे तंबू उठायची वेळ झाली आहे,” असं सांगत संजय राऊतांनी म्हटलं की, “शिवसेनेचा वर्धानपनदिन १९ जूनला ष्णमुखानंद हॉल येथे वाजत-गाजत होणार आहे. तसेच, रविवारी वरळीला राज्यव्यापी शिबीर होईल.”