सातारा : शंभर दिवस कार्यालयीन सुधारणांतर्गत राज्याच्या सर्व महसूल विभागातील कृषीच्या ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा कार्यालयाला पुणे महसूल विभागात पहिला क्रमांक तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कृषी विभागात दुसरा क्रमांक मिळालेला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम नुकतीच राबविणेत आली. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय दैनंदिन कामकाज व अथक परिश्रम करून अनुक्रमे संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता (अभिलेख वर्गीकरण, मुदतबाह्य अभिलेखे नष्ट करणे, जड वस्तू संग्रह नोंदवही अद्ययावतीकरण करणे यासह शेतकरी व इतर अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय, कृषी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच नावीण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा व अधिनस्त ९ कार्यालयांना आय एस ओ मानांकन प्राप्त झालेले आहे. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्हा एकूण १० कार्यालये आय एस ओ मानांकन असलेला एकमेव पहिला जिल्हा ठरला आहे.