सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना शून्य रुपयात बँक खाते उघडून देणार असल्याची माहिती सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाने दि १ जुलै पासून सुरू केली आहे .बँक खात्या अभावी महिलांचे नुकसान होऊ नये व खाते उघडताना त्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

या महिलांची ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य शिल्लक) खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तात्काळ उघडून घेणेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . हे खाते उघडणेसाठी महिलांनी खाते उघडणेचा फॉर्म , २ फोटो, आधार कार्डची प्रत इ. कागदपत्र आवश्यक राहतील .

हेही वाचा…सोलापुरातील मेफेड्रोन तस्करी; तीन आरोपींना मोक्का अंतर्गत पोलीस कोठडी

जिल्हयात बँकेच्या ३०७ शाखा व १२ विस्तारीत कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करीत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिव्हाळ्याची सेवा देण्यास सदैव तत्पर आहे. बँकेचे सर्व ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून रू. ५ लाखापर्यंतचे सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे . बँकेने कर्ज वसूलीचे कामकाज सातत्याने प्रभावशाली केलेने गत १७ वर्षे बँकेच्या निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखले आहे .

हेही वाचा…“कांद्याने अनेकांना रडवलंय, त्यामुळे काहीही करून…”, अजित पवारांची भर सभेत पीयूष गोयल यांना विनंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेणेसाठी ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन उघडून घेणेसाठी बँकेच्या नजिकचे शाखेमध्ये संपर्क साधावा .असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील , उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे .