कराड : पश्चिम घाटक्षेत्र आणि कोयना पाणलोटात तुफान तर, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोयना धरणातील जलआवक २४ तासांत जवळपास पाचपट झेपावली आहे. त्यात जलसाठ्यात ३.२८ टीएमसी पाण्याची वाढ होऊन तो ३८.२८ टीएमसी (३६.३७ टक्के) झाला आहे. अन्य धरणक्षेत्रंही जोरदार पावसाने व्यापली आहेत.

कोयना पाणलोटात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक २३४ मिलीमीटर (९.२५ इंच) एकूण २,२१०, कोयनानगरला १७७ (७ इंच) एकूण १,९१७, महाबळेश्वरला ८४ (३.३० इंच) एकूण १,७०५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. कोयना पाणलोटातील २४ तासांतील हा पाऊस १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण १,९४४ मिलीमीटर (७६.५४ इंच/ वार्षिक सरासरीच्या ३८.८८ टक्के) झाला आहे. कोयनेतील जलआवक १३,२४० क्युसेकवरून ६४,०५८ क्युसेक अशी पाचपट झेपावली आहे. मुसळधारेमुळे बहुतेक जलाशयांमध्ये पाण्याचा ओघ पटीने वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर धो-धो पाऊस होत आहे. अतिशय पोषक पावसामुळे खरीपाचा एकूणच पेरा सर्वोत्तम राहणार असल्याचे आनंददायी चित्र आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : “निवडणुकीत हौशे, नवशे, गवशे येतील अन्…”, बारामतीतून अजित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

रविवारी दिवसभर प्रमुख जलाशयांवरही जोरधार सुरु आहे. त्यात वारणा धरणक्षेत्रात ९७ मिलीमीटर खालोखाल कुंभी ८३, तारळी ७८, मोरणा ५४, कास ३७, कडवी ३२, धोम-बलकवडी २५, दुधगंगा २०, उरमोडी १७, धोम १३ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.

हेही वाचा – सातारा: प्रशासनाच्या निषेधार्थ रिपाईचे रस्त्यावरील पाण्यात होड्या सोडून आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्यत्र, वाळवणला १५८ मिलीमीटर (६.२२ इंच) खालोखाल धनगरवाडा १३१, पाथरपुंज १२० एकूण सर्वाधिक २,५२२ मिलीमीटर (९९.२९ इंच), निवळे व कटी ११९, गगनबावडा ८४, पाडोळशी ८२, दाजीपुर ७७, वाठार ७३, रेवाचीवाडी ७१, चाफळ ६०, ठोसेघर धबधबा ५८, सावर्डे ५७, पडसाली ४७, जोर, जांभूर, गजापूर, वाकी, किर्लोस्करवाडी येथे ४५, शिगाव येथे ४१ मिलीमीटर असा सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे.