वाई: पाचगणी खिंगर (ता महाबळेश्वर) येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टमध्ये बारबाला नाचवून पैसे उधळल्या प्रकरणी बारा बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ खते औषधे बी बियाणे विक्रेते व इतर असे एकूण ४८ जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली. यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली. पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉ. विजय दिघे (आंबेघर ता जावळी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी पोलीस ठाण्यात कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर केलेली कारवाई मोठी समजली जात आहे.

Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
nagpur, Voters Confused, polling station, Voters Confused between polling station, new hyderabad house, old hyderabad house, voting 2024, lok sabha 2024, election 2024, nagpur news, voting news, marathi news,
नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

हेही वाचा – ‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

हेही वाचा – खानापूर-आटपाडीमध्ये सुहास बाबर निवडणुकीच्या रिंगणात ?

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा पोलीस टीम या रिसॉर्टवर पोहोचली आणि या रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या महिलांच्या नाचगाण्यावर आणि पैसे उडविणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यवसायिकांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे. बाकी काही खत विक्री व्यावसायिक बारबालांसह डान्स करणारे काही जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.