राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवरून बराच गोंधळ उडाला आहे. पक्षाचा आदेश मोडल्याने मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाई निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर सत्यजीत तांबेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. यंदाही काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केला होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. यानंतर नाना पटोलेंनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं. तर, दोन दिवसांतच सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यावर टीव्ही ९ मराठीशी बोलताना सत्यजीत तांबेंनी सांगितलं की, “१८ किंवा १९ तारखेला यावर सविस्तर बोलणार आहे.”

हेही वाचा : नाशिकमध्ये ‘राजा का बेटा’ विरुद्ध ‘सामान्य मुलगी’ थेट लढत; पाचही मतदारसंघात शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पक्षश्रेष्ठींचा गैरसमज…”

“सत्यजीत तांबे किंवा मी भाजपाचा पाठिंबा मागितला नाही आणि मागणारही नाही. सत्यजीत तांबे यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत आहेत. आमच्या पक्षश्रेष्ठींचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्याबद्दल आम्ही बसून चर्चा करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली आहे.