सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामाला आता वेग आला आहे, हा नव्याने ६० फूट उंचीचा आठ मीमी जाडीचा पुतळा उभारण्याचे काम श्री.राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून तूर्तास कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या निमित्ताने अनावरण झालेला मालवणी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता चार महिन्यानंतर राज्य सरकारने या ठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार श्री. राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणी’ जमविणाऱ्या ‘ताई’च उपेक्षित!

श्री राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने याआधी गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. सदर बोलीदारांच्या निवेदीची तुलना केल्यानंतर श्री. राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा आठ मिमी जाडीचा हा पुतळा असल्याचे समजले. तीन मीटर उंचीचा मजबूत चौथरा बनविण्यात येणार आहे. या ठिकाणी पुतळ्याची डोक्यापासून पायापर्यंत उंची ६० फूट इतकी असणार आहे तर पुतळा पेलण्यासाठी तीन मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निवेदनुसार शंभर वर्षं टिकेल असा पुतळा बांधणी करण्याची अट आहे. कंत्राटार कंपनीने दहा वर्षे पुतळा देखभाल आणि दुरुस्ती करण्याची अट घातली आहे. आधी तीन फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाची मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाईल. आधीच्या पुतळ्याला कला संचलनाची मान्यता घेतली गेली नव्हती असा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा : शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नव्या पुतळ्याचे काम आयआयटी मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे तसेच पुतळा मजबूत उभारला जाण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री. महेंद्र किणी यांच्या उपस्थितीत कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष हलविण्यात आले.