scorecardresearch

“…त्यानंतरच राज्यातल्या शाळांबाबत पुनर्विचार करू”; राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत कॅबिनेट बैठकीतही विचारविमर्श झाल्याचं टोपे यांनी सांगितलं.

Rajesh Tope
(संग्रहित छायाचित्र)

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह अनेकांनी शाळा सुरु करण्याची मागणी केली. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं विधान केलं आहे. शाळा पुन्हा सुरू होणार की नाही, कधी सुरू होणार याबद्दल टोपे यांनी भाष्य केलं आहे.

जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, मला असं वाटतं, एकंदर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे, मुलांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. याबद्दल कॅबिनेट बैठकीतही भरपूर चर्चा झाली आणि या चर्चेतून एवढंच ठरलं की आता एक १०-१५ दिवस शाळा बंदच राहतील. तोपर्यंत राज्यातली परिस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विचार करून आणि १५ दिवसांनंतरची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की बंद याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Schools in maharashtra health minister rajesh tope vsk

ताज्या बातम्या