ठाण्यातील भिवंडीमधील एका स्वयंघोषित बाबाने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे या मुलीच्या आईनेच आरोपीला हा गुन्हा करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. आता पोलिसांनी या मुलीची आई आणि स्वयंघोषित बाबा या दोघांनाही अटक केली आहे. या पीडित मुलीने नारपोली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महिलेशी संबंधित आणखी एकाला देखील अटक करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

तक्रारदार पीडित मुलीने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, तिच्या मानेला तीव्र वेदना होत होत्या आणि त्यावेळी या आरोपीने (स्वयंघोषित बाबाने) असं सांगितलं की, तिच्या मृत काकाचं भूत तिच्या शरीरात आहे. त्याचप्रमाणे, ह्यातून बरं होण्यासाठी आपण या मुलीला मदत करू शकतो असा दावाही या बाबाने केला. हेच आमिष दाखवून तो बाबा पीडित मुलीला जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, यावेळी या मुलीला जंगलात घेऊन जाण्यासाठी तिची आई आणि तिच्या ओळखीचा युवक देखील होते.

भारतीय दंड संहिता, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र मानवी बलिदान निर्मूलन आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा तसेच काळी जादू प्रतिबंध कायद्याच्या कलमांनुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.