करोनामुळे संचारबंदी व बाजारपेठ बंदच्या काळात सातारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या समन्वयाने भाजीपाला आणि फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाशिवंत मालाचे नुकसान होवून, शेतकऱ्यांच्या पदरी तोटा येऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कृषी विभागाने सात हजार टन फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी समन्वय घडवून आणल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणू संकट आणि लॉकडाउया काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल ७ हजार १३५ टन शेतमालाची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेवून शेतकरी व प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावली. लॉकडाउनच्या काळामध्ये गावातील आणि शहरातील आठवडी बाजार बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतामध्येच पडून राहण्याची भीती होती. शेतकऱ्यांची नेमकी ही अडचण लक्षात घेत, शेतकरी व ग्राहक यांच्यात केवळ दुवा म्हणून काम करत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी उपलब्ध बाजारपेठेची माहिती देणे. विविध शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शेतमालाची थेट विक्री करु इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला शहरातील ग्राहक मिळवून देणे.
शेतकरी आणि प्रत्यक्ष ग्राहक यांच्यामध्ये शेतमाल विक्रीसाठी समन्वय ठेवणे. शेतमाल पडून न राहता वेळीच बाजारपेठ मिळाली.संचारबंदी आणि बाजारपेठ बंदच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले.भविष्यातील विक्रीसाठी बाजारपेठेबद्दल माहिती मिळाली.कृषी विभागाने संपुर्ण जिल्ह्यामध्ये १० ते १५ शेतकऱ्यांचा मिळून ५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक गटांची स्थापना केली. या उत्पादक गटांच्या मालाची विक्री आणि थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साधारण १६० विक्री केंद्र कार्यान्वित करुन दिले.

या शेतमालामध्ये ४ हजार ५४३ टन भाजीपाला आणि २ हजार ५९१ टन विविध फळांचा समावेश आहे. ही सर्व विक्री ऑनलाईन आणि थेट स्वरुपात झाली आहे. लॉकडाउन लागू झाल्यापासून आजअखेर पर्यंतच्या केवळ तीन महिन्यामध्येच ही विक्री झाली आहे.

याबाबत विजयसिंह पोपटराव भोसले, अध्यक्ष, जिजामात शेतकरी स्वयं: सहायता समूह, पेरले (ता. कराड) म्हणाले की, शेतकरी स्वयंसाह्यता समुहाची नोंदणी करण्यास मदत केली. तसेच पुणे येथील विविध सोसायटी ग्राहक म्हणून मिळवून दिल्या. यानंतर या समुहामार्फत आम्ही ४२ ते ४३ शेतकऱ्यांचा भाजीपाला एकत्रीत करुन तो पुणे येथे नेऊन विकत होतो. यामधून आम्हा सर्व शेतकऱ्यांना लॉकडाउन काळातही चांगला नफा मिळाला.

विविध शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांना शहरातील सोसायट्यांशी समन्वय साधून लॉकडाउन काळामध्ये फळे व भाजीपाला पुरवठा नियमित करण्याचे कामकाज कृषी विभागाने केले. शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. तसेच शेतकरी व ग्राहक अशा दोघांना फायदा झाला. लॉकडाउनमध्ये कृषी विभागाने शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले.  असे साताराचे जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी  विजयकुमार राऊत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven thousand tons of agricultural produce sold in satara during the lockdown msr
First published on: 24-06-2020 at 19:27 IST