महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सत्तासंर्घाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी एक सूचक ट्विट केलं आहे. जेव्हा भूकंप येणार असतो, तेव्हा पक्षांचं वर्तन बदलत असतं. ही एक प्रकारे भूकंपाची पूर्वसूचना असते. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांची भेट झाली. काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, असं ट्वीट रोहित पवारांनी केलं. या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेग-वेगळे अर्थ काढण्यात येत आहेत.

काय म्हणाले रोहित पवार?

ट्वीट करत रोहित पवार म्हणाले की, “भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते… असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली, असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि हावभाव पडलेले होते. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं,” असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून बच्चू कडूंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाले, “मग अजित पवारांना…”

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८-१८ तास…”

याला आता शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमच्या आमदारांची चेहरे ओळखायला रोहित पवार काय मनकवडे आहेत का? ५० आमदारांची काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यातील अस्वस्थ आमदारांबाबत चिंता करा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८-१८ तास काम करतात. ठराविक आमदारांची काम होतात, असं काही नाही.”

हेही वाचा : शेवटी आईचं काळीज! सिन्नरमध्ये बछड्यांना घेऊन जाताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

शेवटी आईचं काळीज! सिन्नरमध्ये बछड्यांना घेऊन जाताना मादी बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कसलाही भूकंप होण्याची किंचित शक्यता नाही. झालाच तर…”

“कोणत्याही विभागाच्या फाईल्स राहत नाहीत. अडीच वर्षात झाली नसलेली कामं आता होत असल्याने त्यांना बघवत नाही. म्हणूनच आमच्यात काहीतरी वितुष्ट निर्माण होईल, असं भडक भाष्य रोहित पवार करत आहेत. कसलाही भूकंप होण्याची किंचीत शक्यता नाही. झालाच तर महाविकास आघाडीत होईल. तो झाला तर त्यातून रोहित पवारांना सावरण अवघड होईल,” असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी लगावला आहे.