बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या निवडणूक लढविणार हे स्पष्टच असले तरी आज पक्ष म्हणून त्यांची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केली. बारामती लोकसभेतील भोर विधानसभेत आयोजित ‘महासभा एकनिष्ठेची, या महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे आजच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या कथित उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची अचानक भेट झाली होती. दोघींनी गळाभेट घेऊन एकमेकांची विचारपूसही केली होती. त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी घोषित करून अधिकृतपणे प्रचाराचे रणशिंग फुंकले.

Video: बारामतीत नेमकं चाललंय काय? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांची गळाभेट; अनेकांच्या भुवया उंचावल्या!

कसली आलीये मोदी गॅरंटी? 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार यांनची मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी गॅरंटी असा प्रचार केला जात आहे. पण आधी दिलेल्या गॅरंटीचं काय झालं?
परदेशातला काळा पैसा आणेन आणि शेतकऱ्यांच्या खिशात टाकेल, असे मोदींनी सांगितले होते. पण एक दमडी परदेशातून आली नाही. दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकरी हजारोंच्या संख्येने आले होते. एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या थंडीत, पावसाळा आणि कडक उन्हात आंदोलनाला बसले. पण वर्षभरात एकदाही ढुंकून बघण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे मोदींच्या गॅरंटीवर आम्हाला विश्वास नाही.

‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ केलं’, रोहित पवारांची काका अजित पवारांच्या साम्राज्यावर टीका

कुठेही जा, बेरोजगार तरुणांचे लोंढे दिसतात

“आज बेरोजगारीची मोठी समस्या उभी राहिली आहे. हजारो तरूण नोकरीसाठी वण-वण हिंडत आहेत. मला आजही हाती पत्र आले की, अमुक एक तरूणाला नोकरीची आवश्यकता आहे, कुठे तरी पाहा. तरुणांची फौज देशाच्या भल्यासाठी वापरण्याऐवजी त्यांना बेकार ठेवण्याचे आणि त्यांचे घर संकटात ढकलण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देशात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज मी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करतो”, असे शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; भर सभेत म्हणाल्या, “अरे प्रेमाने…”

देशात नावाजलेल्या खासदाराला निवडून द्या

शरद पवार पुढे म्हणाले, “मागच्या तीन निवडणुकात मतदारांनी सुप्रिया सुळेंना निवडून दिलं. देशातील पहिल्या दोन-तीन खासदारांमध्ये बारामतीच्या खासदाराचा उल्लेख होतो. संसदेत ९८ टक्के उपस्थिती दाखविल्याबद्दल त्यांचे नाव घेतले जाते. सात वेळेला त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांना निवडून देणं, मतदारांची जबाबदारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भोरच्या जनतेने विधानसभेसाठी संग्राम थोपटे यांना निवडून दिलं आहे. त्यामुळे या व्यासपिठावरून सांगतो संग्राम थोटपे तुम्ही या तालुक्यासाठी जे काही कराल, त्याच्या पाठी शरद पवार ठामपणे उभा आहे. राजकारणात विकासाच्या मागे शरद पवार उभे राहिले तर काय परिणाम होतो, हा दाखविल्याशिवाय मी राहणार नाही”, असे आश्वासन शरद पवार यांनी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना दिला.