नाट्यपरिषदेमध्ये सुरू असलेल्या वादाची चर्चा होत असताना नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाला आपण तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला आहे. आज ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या नियामक मंडळ सभेमध्ये शरद पवार, शशी प्रभू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तसेच, मोहन जोशी, अशोक हांडे, गिरीश गांधी या चार सदस्यांची नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. या सभेला ५९ पैकी एकूण ४१ सदस्य हजर होते तर ७ सदस्यांनी आपला पाठिंबा पत्राद्वारे कळविला होता.

दरम्यान, या सभेसमोर बोलताना शरद पवारांनी नाट्यविषयक उपक्रम राबवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. नाट्य परिषदेच्या भावी कार्यासाठी महत्वपूर्ण योजना राबविण्यात याव्यात व नाट्य परिषदेच्या संकुल दुरुस्तीसाठी व नाट्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी तसेच शाखांच्या सक्षमीकरणासाठी मोठा निधी उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याबाबत राज्य शासनाची मदत मिळणेकामी विशेष प्रयत्न करू असे ते म्हणाले. सांस्कृतिक क्षेत्र व नाट्यक्षेत्र पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. नाट्य परिषदेत असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की ज्यांना कुणाला वाद घालायचे त्यांना वाद घालू द्या. ज्यांना कुणाला मुलाखती छापायच्या त्यांना छापूद्या. नाट्य परिषदेच्या व नाट्य क्षेत्राच्या या कामासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे.

Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नाट्यसंकुलाची लवकरच डागडुजी

दरम्यान, मोडकळीस आलेल्या नाट्यसंकुलाची लवकरच डागडुजी केली जाईल, असं आश्वासन शशी प्रभू यांनी दिलं आहे. “नाट्य संकुल मोडकळीस आलेले नसून, ते पाडून नव्याने उभारण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. लवकरच त्याची डागडुजी करून रसिक प्रेक्षकांसाठी ते खुले केले जाईल. तसेच, नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखासाठी एक निधी उभा केला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.