गुरव समाजाच्या राज्य अधिवेशनासाठी सोलापुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा आणि काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. अतिश बनसोडे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदींनी राष्ट्रीय महापुरूषांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पुण्यात पिंपरी- चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर काळी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. सोलापुरातही राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या संबंधित नेत्यांविरूध्द आंदोलनाचे सत्र सुरूच आहे.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सोलापुरात आले असता कोणतेही आक्षेपार्ह आंदोलन किंवा कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. विमानतळापासून ते शासकीय विश्रामगृह आणि गुरव समाजाचे अधिवेशनस्थळ-विजापूर रस्त्यावरील नेहरू नगरच्या शासकीय मैदानापर्यंत पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता.
गुरव समाजाचे अधिवेशन संपवून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही मुंबईला परतण्यासाठी विमानतळाकडे जात असताना अधिवेशनस्थळापासून काही अंतरावर एका कार्यकर्त्याने शिंदे व फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा आणि काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न केला. हा कार्यकर्ता घोषणा देत पुढे येत असताना पोलिसांनी त्यास तात्काळ पकडून ताब्यात घेतले.