scorecardresearch

“भास्कर जाधव कुत्र्यासारखा बेफाम…”, रामदास कदमांची शिवराळ भाषेत टीका!

रामदास कदमांनी शिवराळ भाषेत भास्कर जाधवांवर टीका केली आहे.

bhaskar jadhav and ramdas kadam
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही खेड येथेच सभेचं नियोजन केलं आहे. आज (रविवार) सायंकाळी पाचच्या सुमारास ही सभा होणार आहे.

या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही या सभेला विरोध करत शिंदे गटावर टोलेबाजी केली. “सभा कशाला घेत आहात. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर बोलायला पाहिजे…” असा सल्ला भास्कर जाधवांनी दिला. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवराळ भाषेत टीकास्र सोडलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार?; अशोक चव्हाणांचं सूचक विधान, न्यायाधीशांच्या मतांचा हवाला देत म्हणाले…

यावेळी रामदास कदम भास्कर जाधवांना उद्देशून म्हणाले, “अरे अजून सभाच झाली नाही. तर कशावर बोललं पाहिजे? हे तुम्ही कसं काय ठरवू शकता. आधी सभा तरी होऊ द्या. मग कोण कशावर बोललं, हे तुम्हाला कळेल. भास्कर जाधव हा नुसता कुत्र्यासारखा भुंकतोय. त्याच्याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. त्याचा तोल गेला आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी स्वत: आता भास्कर जाधवांच्या मतदारसंघात लक्ष घातलं आहे. माझ्याकडे दोन वर्षे आहेत. आता मी त्याला गाडणारच आहे, हे त्याला कळालं आहे. त्यामुळे तो कुत्र्यासारखा बेफाम भुंकतोय. मी त्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही.”

हेही वाचा- “लफडी बाहेर काढली, तर…”; रामदास कदमांचा अंबादास दानवेंना इशारा, थेट धमकी देत म्हणाले…

‘राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढच्या निवडणुकीत थांबलं पाहिजे, असा माझा विचार आहे” या भास्कर जाधवांच्या विधानाबाबत विचारलं असता रामदास कदम म्हणाले, “अरे तू थांबलास किंवा थांबला नाहीस… तरीही मी तुला गाडणारच आहे. कारण तुझी औकात नाही. तुझी लायकी नाही. तू नीच आहेस. तू महानीच आहेस. तुझा मेंदू सडलेला आहे. तू वाटेल ते बडबडतो. तुला उपकाराची अजिबात जाणीव नाही. ज्या थाळीमध्ये खातोस तिथेच तू छेद करतो. असा तू नालायक माणूस आहेस. त्यामुळे पुन्हा तुला विधीमंडळात जाण्याचा नैतिक अधिकारही नाही. तुला मी गाडणार एवढं १०० टक्के नक्की आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 15:49 IST