राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार बेकायदा आहे. हे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जातो. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील ‘सामना’ दैनिकातील ‘रोखठोक’ या सदरात सरकारच्या वैधतेवर भाष्य केले आहे. त्यांनी राज्यातील सध्याचे सरकार अवैध आहे. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा खटला न्यायालयात सुरू आहे. सर्व काही कायद्याने झाले तर आमदारांसह शिंदे सरकार घरी गेलेले दिसेल. असा दावा संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा >> “संभाजीराजे धर्मवीर नव्हते म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” संजय गायकवाडांचे अजित पवारांवर टीकास्र; म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी…”

‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही फोडण्यात आली. सत्तेच्या गैरवापराचे हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडले. मावळत्या वर्षात महाराष्ट्राने एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिले. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडे ढकलत आहेत. १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल,’ असे संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा >> फडणवीस यांच्या बीड दौऱ्यात मुंडे भगिनी गैरहजर

‘नव्या वर्षात राज्यात व देशात प्रेरणादायी घडावे अशा अपेक्षेत लोक आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांनी भाजपच्या घोडदौडीस लगाम घातला. दिल्लीची महापालिका व हिमाचल राज्य भाजपने गमावले. त्यामुळे स्वतःच्याच घरात म्हणजे गुजरातमध्ये विजय मिळवला यास महत्त्व नाही. तरीही देश एका भीतीच्या सावटाखाली आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, सरकारी यंत्रणा आपले बोलणे ऐकते आहे असे प्रत्येक प्रमुख माणसाला वाटते. हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही,’ अशी टीका राऊत यांनी केली.

हेही वाचा >> संजय शिरसाटांच्या मुलाकडून हात-पाय तोडण्याची धमकी; कथित ध्वनिफित व्हायरल होताच तक्रार दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सर्वत्र जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही. हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे. जगात कोणीच अमर नाही हे लक्षात घेतले तर मोदी व शहांनी देशात द्वेषाची आणि फाळणीची बीजे रोवू नयेत. राममंदिराचा प्रश्न निकाली निघाला, त्यावर आता मते मिळणार नाहीत. तेव्हा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्दय़ावर मोर्चे व आंदोलने सुरू केली गेली. कोणत्याही जातीधर्मातील स्त्रीवर अत्याचार होऊ नयेत,’ असे मत संजय राऊत यांनी मांडले.