विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बारामती मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आपण अर्ज भरायला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान विजय शिवतारे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र शिंदे गटाने शिवतारे यांच्या पवित्र्याबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसते. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. महायुतीत राहायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. जर हे मान्य नसेल तर प्रत्येकाला आपला स्वतःचा मार्ग आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही.

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “आम्ही कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून थांबवू शकत नाही. एखादा व्यक्ती पक्षात असेल तर त्याला पक्षाच्या चौकटी लागतात. पण जर कुणी पक्षच सोडला तर त्याला पक्षाचे आदेश लागू होत नाहीत. अशी व्यक्ती स्वतंत्र असतो, त्याला आम्ही अडवू शकत नाही. विजय शिवतारे यांना बारामतीमधून लढायचे असेल तर त्याच्याशी आमचा संबंध नाही.” शिंदे गटाच्या या पवित्र्यामुळे विजय शिवतारे यांच्याबाबत शिंदे गट फारसा गंभीर नाही, असे चित्र अजित पवार गटात निर्माण झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

शरद पवारांना धक्का; रासपचे महादेव जानकर महायुतीत परतले, लोकसभेची एक जागा मिळणार

तर महायुतीमधून बाहेर पडू

द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, “आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.”

“.. तर महायुतीमधून बाहेर पडू”, अजित पवार गटाचा आता निर्वाणीचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय शिवतारेंचा अंत जवळ आला

विजय शिवतारे हे बालिश विधानं करत आहेत. दिवा विझण्यापूर्वी जसा फडफडतो, तसा शिवतारे यांचा राजकीय अंत जवळ आल्याचे दिसते, अशी टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली. “शिवतारे यांनी विंचू आणि चप्पलची उपमा देऊन स्वतःची अक्कल पाझळली आहे. “विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी”, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांना लागू पडतो. जसे विंचवाच्या अंगी विष असतं तसं शिवतारे हे विषारी प्रवृत्तीचे आहेतठ, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.