सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रतापदिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेदेखील उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने निधी द्यावा, गडकिल्ल्यांवर येणाऱ्या शिवभक्तांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. तसेच रायगड, प्रतापगडच नव्हे तर राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रामुख्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>>> शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे अनुपस्थित? राज्यपालांच्या शिवरायांवरील विधानामुळे नाराज असल्याची चर्चा

“एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवले. मतांचा कोणताही विचार न करता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचे अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. या राज्यात हिंदुंचे रक्षण शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे. प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे. गडावर बरीच पडझड झाली आहे. या गडावर शिवभक्तांना अन्य सुविधा देण्यात याव्यात. तटबंदी, गडाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती दिली जावी, अशी माझी विनंती आहे,” असे यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

हेही वाचा>>>> The Kashmir Files Controversy: “नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड”

“पंढरपूरच्या आरतीला जसा मान असतो तशीच परंपरा प्रतापगडावरही सुरू करावी. शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला येणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. हीच प्रथा आगामी काळातही सुरु राहावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. प्रतापड, रायगडच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांसाठी वेगळ्या प्राधिकरणाची स्थापना करता येईल, का यावर विचार व्हावा. आपण योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी विनंती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivendra raje bhosale demandes cm eknath shinde work for conservation of forts prd
First published on: 30-11-2022 at 15:58 IST