कोल्हापूर : मविआकडून खासदार संजय मंडलिक यांच्यावर चुकीची टीका केली आहे. असे होत असेल तर प्रत्युत्तर द्यावे लागेल. त्यामध्ये शाहू महाराज यांच्यावर टीका होईल. हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे, असा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश अग्रेषित होत आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले आहे. त्यावर मुश्रीफ यांनीसुद्धा चुकीच्या प्रचारावरून परखड मत मांडले आहे.

Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील

हेही वाचा – “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीला जशास तसे उत्तर दिले. ते म्हणाले, मला एक चित्रफीत दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये मविआकडून संजय मंडलिक यांच्यावर चुकीची टीका केली आहे. असे होत असेल तर प्रत्युत्तर द्यावे लागेल. त्यामध्ये शाहू महाराज यांच्यावर टीका होईल. हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.