अनेक राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकाच वेळी ४० आमदार सोडून गेल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून लोकांची आणि शिवसैनिकांची भेट घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी का झाली? याबाबत मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना काही जणांना महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे चाललंय, हे काही लोकांना बघवलं नाही, त्यामुळे गद्दारी झाली, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ –

निष्ठा यात्रेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सगळीकडेच लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद शिवसेनेसोबत आहेत. सामान्य नागरिक असतील किंवा राजकीय लोक असतील, त्यांना माहीत आहे, शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंबप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. त्यामुळे सगळीकडेच शिवसैनिकांचं प्रेम आणि आशीर्वाद पाहायला मिळत आहे. जे अराजकीय लोक आहेत ते देखील महाराष्ट्रात जी सर्कस झाली, त्यावर लक्ष ठेवून होते. आम्ही महाराष्ट्रात फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत, कुणावरही आरोप करत नाही ना कुणावर टीका करत आहोत,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- “…आता सगळ्यांच्या हातात खंजीर”, संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांवर टीकास्त्र!

पुढे त्यांनी सांगितलं की, “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं नक्कीच दु:ख आहे. अजूनही दिसतंय सर्वकाही सुरळीत चाललं होतं. पण कुठे ना कुठे काहींच्या मनात महाराष्ट्राबाबत पोटदुखी होती. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे जातोय, हे बघवत नव्हतं. म्हणून ही गद्दारी झाली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader aaditya thackerays big statement on betrayed and rebel mla rmm
First published on: 12-07-2022 at 21:22 IST