scorecardresearch

“गुलाबराव पाटलांनी आजोबा बदलले, आता…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची आगपाखड!

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडलं आहे.

“गुलाबराव पाटलांनी आजोबा बदलले, आता…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची आगपाखड!
संग्रहित फोटो

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडलं आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले, अशा आशयाची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे. ते भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटलांवर टीकास्र सोडताना अंबादास दानवे म्हणाले की, तुम्ही जर हिंदुत्वाविषयी बोलत असाल तर परवा सांगलीमध्ये साधूंवर हल्ले कसे झाले? तुमचं नेमकं हिंदुत्व काय आहे? शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या वेळी मदत न करणं, हे तुमचं हिंदुत्व आहे. राज्यात ज्या आत्महत्या होतात, त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं हिंदुत्व आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेलं हिंदुत्व हे नाही. प्रबोधनकारांनी सर्वसामान्य माणसाची सेवा करणं हेच खरं हिंदुत्व असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…

तुम्ही यापूर्वीची गुलाबराव पाटलांची भाषणं नीट ऐका. त्यांना शिवतीर्थावर भाषण करायला संधी दिली होती. त्यावेळी गुलाबराव पाटील स्वत: शिवसेनेमध्ये या, बाळासाहेब ठाकरेंकडे या, उद्धव ठाकरेंकडे या… असं म्हणत होते. मात्र, आता त्यांनी बंडखोरी केली आहे. गद्दारी केली आहे. यामुळे त्यांनी आपला आजोबाही बदलला. एकनाथ शिंदे हे त्यांचे आजोबा झाले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena leader ambadas danve on gulabrao patil changed his grandfather rmm

ताज्या बातम्या